Masala (Spiced)Tea
मसाला चहा नाव वाचताच चहा न प्यावा वाटणारा माणूस मिळणे दुर्मिळच.हा चहा भारतीय उपखंडात प्रसिद्ध आहे.सर्वच कोपर्यावरील टपरी वर मिळणारा परंतु चवी त मात्र फरक असलेला हा चहा भारतीय घरात बनतोच बनतो.हा चहा बनवायच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या.यात जो मसाला वापरतात तो म्हणजे वेलची,दालचिनी, आलं,लवंग,जायफळ, काळी मिरी.यात सर्व ठिकाणी वापरतात ते म्हणजे आलं आणि वेलची. दालचिनीचा ग्लुकोजच्या पातळीवर प्रभाव पडतो व वजन कमी होते.काळ्या मिरीने वजन कमी व्हायची process जलद होते.वेलचीने fat जळायला मदत होते.यातील सर्व मसाल्यात fat burning properties आहेत.असा हा चहा वजन कमी करण्यासाठी नक्की प्यावा परंतु साखर किंवा मधाचा वापर मात्र करू नका. प्रत्येक मसाल्याचा आपला असा वेगळी चव व सुवास असतो.हा चहा पिताच तुमच्या जिभेवर चव रेंगाळतच राहते.एक कप चहा पिताच शरीरात उत्साह येतो.पाहुणे आले आणि हा चहा बनलाच नाही असे घर सापडणे अवघडच परंतु चहाचा मसाला वापरताना जपूनच वापरा बरं! नाही तर चवीची बेचव व्हहायला वेेळ लागणार नाही. En...